खरं तर गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातले मतभेद आणि त्यांना एकमेकांच्या त्यागाबद्दल असलेला सन्मान, यावर चर्चा झाली पाहिजे!

२०१४च्या निवडणुकीपूर्वी संघाच्या शाखांतून आणि भाजपकडून सरदार पटेल यांचा वापर गांधी-नेहरू यांना लक्ष्य करण्यासाठी केला जायचा. सत्तेत आल्यानंतर भाजपकडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही वापर गांधी-नेहरूंच्या प्रतिमा हनन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला गेला. महात्मा गांधी यांना लक्ष्य करणारा बराच मजकूर मागच्या सहा वर्षांपासून उजव्या विचारसरणीकडून सोशल मीडियावर प्रसृत करण्यात येत आहे.......